लिंपोपो नदी
लिंपोपो नदी : क्रॉकोडाइल. आग्नेय आफ्रिकेतील एक मुख्य नदी. लांबी सु. १,७७० किमी. पाणलोट क्षेत्र ४,४०,००० चौ. किमी. दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकातील ट्रान्सव्हाल प्रांताच्या उत्तर भागात विट्वॉटर्झरँड प्रदेशाच्या उत्तर उतारावर उगम पावणारी ही नदी, विशेषतः उगमाकडील भागात, ‘क्रॉकोडाइल’ या नावाने ओळखली जाते.